महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इस्लामपुरचे 'ते' चौघेही कोरोना मुक्त; सांगलीतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 वर

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी, नागरिकांनी ओव्हरकॉन्फिडन्स मध्ये राहू नये, आपला जिल्हा अजून कोरोना मुक्त झाला नाही, त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी जयंतराव पाटील यांनी केले आहे.

FOUR COVID 19 PATIENT
इस्लामपुरचे 'ते' चौघेही कोरोना मुक्त; सांगलीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 वर

By

Published : Apr 5, 2020, 10:47 PM IST

इस्लामपूर (सांगली) - सौदी अरेबियामधून आलेले इस्लामपूर मधील पाहिले 4 कोरोनाबाधित रुग्ण आता कोरोना मुक्त झाले आहेत. शनिवारी घेतलेली दुसरी टेस्टही नेगिटिव्ह आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ वर आला आहे.

इस्लामपुरचे 'ते' चौघेही कोरोना मुक्त; सांगलीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 21 वर
सांगलीच्या इस्लामपूरमधील जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या 4 कोरोनाबाधित रुग्ण हे कोरोना मुक्त झाले आहेत. सौदी अरेबिया येथून (उमराह) इस्लामपूर येथील कुटुंब हे १४ मार्च रोजी आपल्या गावी परतले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ मार्च रोजी त्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन मिरजेच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल केले होते आणि या चौघांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. यामुळे जिल्हा प्रशासन हादरून गेले. तर या चार कुटुंबाच्या संपर्कात सुमारे चारशेहून अधिक जण आल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन चक्रावून गेले होते.

त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या जवळच्या २२ नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे राज्य हादरून गेले होते. या सर्वांना मिरजेच्या आयसोलेशन कक्षात दाखल केले होते. यापैकी पहिल्या चार कोरोना बाधितांचे १४ दिवस पूर्ण झाल्याने शुक्रवारी पहिली टेस्ट घेण्यात आली. ती टेस्ट निगेटिव्ह आली, त्यांनतर शनिवारी पुन्हा आणखी दुसरी टेस्ट करण्यात आली, ती टेस्टही निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांनी दिली आहे.

२१ रुग्णांची प्रकृती स्थिर असून, येत्या काही दिवसात त्यांचा १४ दिवसांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर टेस्ट घेण्यात येतील. मात्र, मूळच्या चौघाजणांचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या कोरोना रुग्णांचा आकडा हा घटून 21 झाला आहे. त्यामुळे सांगलीकर आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी, नागरिकांनी ओव्हरकॉन्फिडन्स मध्ये राहू नये, आपला जिल्हा अजून कोरोना मुक्त झाला नाही, त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही यावेळी जयंतराव पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details