महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजप आमदार सुधीर गाडगीळ, त्यांच्या पत्नी कोरोना कोरोनाबाधित - update corona news in sangli

भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. आमदार गाडगीळ यांच्या पत्नी मंजिरी गाडगीळ यांंनाही कोरोनाची बाधा झाली आहे.

sangali
भाजपा आमदार सुधीर गाडगीळ

By

Published : Aug 20, 2020, 6:04 PM IST

सांगली - भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुरुवारी त्यांची आरटीपीसी टेस्ट करण्यात आली होती. रात्री त्यांंचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याबरोबर आमदार गाडगीळ यांच्या पत्नी मंजिरी गाडगीळ यांंचीही तपासणी करण्यात आली होती. त्यांचा सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर दोघांचीही प्रकृती उत्तम असून त्यांंच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी मिरजेचे भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि त्यांच्या पत्नीसह कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्याचबरोबर काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार मोहनराव कदम व त्यांच्या कुटुंबातल्या पाच जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता सांगलीच्या आमदारांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याने सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details