महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Yashodhara Raje Shinde : फॉरेन रिटर्न सरपंच यशोधराराजे शिंदे; परदेशातून आली आणि थेट सरपंच झाली - directly became Sarpanch in sangali

यशोधरा राजे शिंदे ( Yashodhara Raje Shinde ) ह्या उच्च शिक्षित तरुणीने सरपंचपदाची निवडणुक जिंकली (Won Sarpanch election ) आहे. परदेशातला शिक्षण सुरू ( Start studying abroad ) होते, घरच्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, मग ती थेट शिक्षण सोडून गावी आली. ( Foreign Return Sarpanch )

Yashodhara Raje Shinde
फॉरेन रिटर्न सरपंच यशोधराराजे शिंदे

By

Published : Dec 21, 2022, 9:23 AM IST

फॉरेन रिटर्न सरपंच यशोधराराजे शिंदे

सांगली : परदेशातला शिक्षण सुरू ( Start studying abroad ) होते, घरच्यांनी निवडणूक लढवण्याचा आग्रह केला, मग ती थेट शिक्षण सोडून गावी आली. सरपंच पदाच्या निवडणुक लढवली ( Contested elections for post of Sarpanch ) आणि जिंकली, इतकच नाही तर तिचे अख्खे पॅनल देखील निवडून आले. एखाद्या चित्रपटाच्या कथानक प्रमाणे हे सर्व प्रकार घडले, मिरज तालुक्यातल्या वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडणूकीमध्ये (Contested elections for post of Sarpanch ) यशोधरा राजे शिंदे ( Yashodhara Raje Shinde ) ह्या उच्च शिक्षित तरुणीने सरपंचपदाची निवडणुक जिंकली (Won Sarpanch election ) आहे. ( Foreign Return Sarpanch )

सगळ्यात लक्षवेधी निवडणूक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू असताना, हि सगळ्यात लक्षवेधी निवडणूक ठरली. कारण ही निवडणूक लढवत होती, फॉरेन रिटर्न असणारी यशोधराराजे महेंद्रसिंह शिंदे. मूळची वड्डी गावची असणारी यशोधराराजे शिंदे वैद्यकीय शिक्षणासाठी तीन वर्षांपासून जॉर्जिया या ठिकाणी वास्तव्यास होती, सध्या अखेरच्या वर्षाचे तिचे शिक्षण सुरू आहे. मात्र हे शिक्षण अर्धवट सोडून, ती थेट ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये उभी राहिली.



रेणुकादेवी ग्रामविकास सरकार पॅनल उभे करण्याचे ठरवले : वड्डी गावाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे घराण्यातील कुटुंबाने रेणुकादेवी ग्रामविकास सरकार पॅनल उभे करण्याचे ठरवले, हे करताना सर्वसाधारण खुले गट असल्याने सरपंच पदासाठी कोणाला उभे करायचा ? असा प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला होता. यातून महेंद्रसिंह शिंदे यांची कन्या यशोधरा राजे शिंदे हिला निवडणुकीमध्ये उभा करण्याचा प्रस्ताव समोर आला, त्यानंतर शिंदे कुटुंबीयांनी यशोधन राजे शिंदे हिच्या कानावर ही गोष्ट घातली, आणि सरपंच पदाची निवडणुक लढवण्यासाठी तिला तयार देखील केले.

यशोधरा राजे शिंदे हिला राजकीय वारसा :यशोधरा राजे शिंदे हिचे पणजोबा हे गावच्या शेजारी असणारया नरवाड गावचे 25 वर्ष सरपंच होते. आजी मंदाकिनी राजे शिंदे यादेखील पाच वर्ष नरवाड गावच्या सरपंच होत्या, वडील देखील राजकारणात सक्रिय असल्याने, यशोधरा राजे शिंदे हिच्या मागे राजकीय वारसा होता. त्यामुळे यशोधरा राजे हिनेदेखील सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी फार आढेवेढे घेतली नाही.

सरपंच पदाची माळ घेतली आपल्या गळ्यात पाडून : सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये कोणतीही तयारी न करता थेट उतरली गावामध्ये प्रचारापासून सर्व पातळीवर यशोधरा हिला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आणि रेणुका देवी ग्रामविकास सरकार पॅनलच्या माध्यमातून लढवलेल्या निवडणुकीमध्ये यशोधरा राजे शिंदे हिला यश देखील आले. तिने सत्ताधारी असणाऱ्या सत्ताधारी गटाच्या झाकीर वजीर यांचा 149 मतांनी पराभव करत सरपंच पदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली.


या विजयानंतर बोलताना यशोधरा राजे शिंदे म्हणाली,राजकीय वारसा हा आपल्या घरामध्येच होता, त्यामुळे ही निवडणूक लढवताना फारशी अडचण आपल्याला आली नाही. घरच्यांचा पूर्ण आणि गावकऱ्यांचा देखील पाठिंबा होता, त्यामुळे हे निवडणूक जिंकणे फार अवघड गोष्ट नव्हती. पण माझ्या निवडीचे सर्व श्रेय हे कुटुंब आणि गावकऱ्यांना आहे. गावच्या विकासाच्या दृष्टीने आपण ज्या काही गोष्टी करायचे निश्चित केला आहे. त्या पाच वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. गावातल्या लहान मुलांच्यासाठी चांगल्या दर्जाची शाळा उभारण्यापासून त्यांना आधुनिक शिक्षण देणे, परदेशात ज्याप्रमाणे गावांचा विकास झालाय,त्या दृष्टीने विकासाचे ध्येय आहे. मुलींच्या शिक्षणापासून महिलांची आर्थिक उन्नती, गावातल्या तरुणांना रोजगार, शेतकऱ्यांच्यासाठी देखील छोटे-मोठे लघुउद्योग उभारणे, अशा गोष्टींवर आपला भर राहणार, असल्याचा यशोधरा राजे शिंदे हिने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details