सांगली- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे जनजीवनासह आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहे. त्यातच जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचाही फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. परिणामी जिल्ह्यातील फुल उत्पादकांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.
मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात फुलांची शेती केली जाते. फेब्रुवारी, मार्च महिन्यात कार्नेशन, जिप्ससो, शेवंती, गुलाब, जरबेरा, झेंडू, निशिगंधा, गलांगडा, असटर अशा अनेक प्रकारचे फुलांची या वेळी उत्पादन घेण्यात आले होते. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारने लग्न, जत्रा, उरूस, यात्रा, समारंभ यांना बंदी घातली आहे.