महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

SANGLI RAIN कृष्णा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत; 15 कुटुंबाचे तातडीने स्थलांतर

संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ सुरूच आहे. गुरुवारी रात्री 11.30 वाजता पाण्याची पातळी 32 फुटांपर्यंत पोहोचली. तर शुक्रवारी सकाळपर्यंत पाण्याची पातळी 40 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज पाटबंधारे प्रशासनाकडून वर्तवण्यात आले आहेत.

floodwater of Krishna river enter in Sangli city
कृष्णा नदीचे पाणी शिरले नागरी वस्तीत

By

Published : Jul 23, 2021, 3:32 AM IST

Updated : Jul 23, 2021, 3:40 AM IST

सांगली - कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने शहरातील नदी काठच्या सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरले आहे .यामुळे या भागातील 15 कुटुंबाचे आणि 56 नागरिकांचे महापालिका प्रशासनाकडून तातडीने स्थलांतर करण्यात आले आहे. याठिकाणी स्वतः महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्यासह पालिका प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी ठाण मांडले आहे.


संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ सुरूच आहे. गुरुवारी रात्री 11.30 वाजता पाण्याची पातळी 32 फुटांपर्यंत पोहोचली. तर शुक्रवारी सकाळपर्यंत पाण्याची पातळी 40 फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज पाटबंधारे प्रशासनाकडून वर्तवण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातल्या पूर पट्ट्यात पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना सायंकाळी देण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिकांनी स्थलांतर केल्याचे सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सिंह यांनी सांगितले.

15 कुटुंबाचे तातडीने स्थलांतर

हेही वाचा-ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा; इतिहासात पहिल्यांदाच शिवलिंग पाण्याखाली!


16 कुटुंबांचे करण्यात आले स्थलांतर

दरम्यान गुरुवारी रात्री 11 नंतर पूर पट्ट्यात असणाऱ्या सूर्यवंशी प्लॉटमधील काही कुटुंबांची महापालिकेच्या शाळेत सुरू करण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये सोय करण्यात आली आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी लक्षात घेऊन महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी
उपमहापौर उमेश पाटील, विरोधीपक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत येथील नागरिकांना स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांना मदत केली आहे.

हेही वाचा-पंचगंगेने मध्यरात्री ओलांडली धोक्याची पातळी; कोल्हापुरात महापुराचे संकट येण्याची भीती

Last Updated : Jul 23, 2021, 3:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details