सांगली -सांगली शहरातल्या महापुराचा फटका जिल्हा कारागृहाला बसला आहे. कारागृहात सध्या पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. शहरात सिटी हायस्कूल या ठिकाणी कैद्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगलीच्या जिल्हा कारागृहात शिरले पुराचे पाणी, 300 कैद्यांचे सुरक्षित स्थलांतर - sangali rain imp news
सांगली शहराला महापुराचा मोठा फटका बसला आहे.सध्या कृष्णेची पाणी पातळी 54.04 फुटांवर पोचून स्थिर झाली आहे. सांगली शहरात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे.त्यामुळे जिल्हा कारागृहात देखील पुराचे पाणी शिरले आहे.कारागृहात सुमारे 300 कैदी असून त्यांना सुरक्षित पणे पटवर्धन हायस्कूल याठिकाणी हलवण्यात आले आहे.
सांगली जिल्हा कारागृह