महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीतील वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे रवाना; म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना सुरू

सध्या कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी कर्नाटक राज्यात वाहून जात आहे, त्यामुळे हे पाणी दुष्काळी भागाला देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. यंदा पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ आणि टेंभू योजना आता सुरू झाल्या आहेत.

flood-water-from-sangali-diverted-to-six-drought-tehsil-including-sangola
सांगलीतील वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे रवाना

By

Published : Aug 18, 2020, 4:55 PM IST

सांगली- जिल्ह्यातून पुरात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला वळवण्यात आले आहे. म्हैसाळ आणि टेंभू सिंचन योजना आजपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पुराचे पाणी दुष्काळी भागाला पोहोचत आहे. जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांसोबतच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याला याचा फायदा होणार आहे. दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पुराचे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

सांगलीतील वाहून जाणारे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे रवाना
सध्या कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणीपातळी वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी कर्नाटक राज्यात वाहून जात आहे, त्यामुळे हे पाणी दुष्काळी भागाला देण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. यंदा पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ आणि टेंभू योजना आता सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील 6 दुष्काळी तालुक्यांना पुराचे पाणी मिळणार आहे. मिरज येथील म्हैसाळ सिंचन योजनेचे 25 पंप सुरू झाले आहेत तर ताकारी नजीकच्या टेंभू सिंचन योजनेतील 15 पंप सुरू करण्यात आले आहेत. दोन्ही सिंचन योजनेतून 2 हजार क्युसेक पाणी उचलून सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील जवळपास 4 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर हे पुराचे पाणी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलापर्यंत जाणार असल्याने या ठिकाणच्या ही दुष्काळी भागाला याचा लाभ होणार आहे. प्रामुख्याने दुष्काळी तालुक्यातील तलाव भरून घेतले जाणार आहेत. 25 तलावात हे पाणी पोहचणार असल्याचे पाटबंधारे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details