सांगली -अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज(14 ऑगस्ट) सांगलीत पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. सांगलीतील महापुराची स्थिती पाहून आपल्या अंगावर काटा आला, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, राज्य सरकारने पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
महापुराची स्थिती अंगावर काटा आणणारी - ऊर्मिला मातोंडकर - गलीवाडी
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज(14 ऑगस्ट) सांगलीत पूर परिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांशी संवाद साधला. सांगलीतील महापुराची स्थिती पाहून आपल्या अंगावर काटा आला आहे, अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, राज्य सरकारने पूरग्रस्तांना सर्वोत्तपरी मदत करणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
शहरातील पूर बाधित सांगलीवाडी आणि गणपती पेठ या भागात उर्मिला यांनी भेट दिली. त्यांनी यावेळी नागरीक आणि स्थानिक व्यापाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून पूर परिस्थितीची भीषणता जाणून घेतली. त्यानंतर बोलताना उर्मिला म्हणाल्या, 'सांगलीकरांचा संपूर्ण संसार आणि व्यापार महापुरात वाहून गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने या सर्वांना मदत करावी. अनेक ठिकाणी सरकारची मदत पोहोचलेली नाही. सरकारने तत्काळ गरजूंपर्यंत मदत पोहोचवावी.'
याप्रसंगी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.