सांगली- जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला. यामुळे कडेगाव, खानापूर आणि कवठेमहांकाळ याठिकाणी नद्यांना पूर आल्याने पूल पाण्याखाली गेले आहेत. तर कडेगावच्या अमरापूर येथील नांदनी नदीला पूर आल्याने एक पूल वाहून गेल्याची घटना घडली. यामुळे कराड-कडेगाव वाहतूक बंद झाली आहे.
सांगली शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीनंतर मुसळधार पाऊस पडला आहे. पहाटेपर्यंत पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर व कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्ट्यातील नद्यांना पूर आला आहे.
कडेगाव तालुक्यातील येरळा आणि नांदनी नदीला पूर येऊन तीन पूल पाण्याखाली गेले आहेत. ज्यामध्ये आसद-चिंचणी रोडवरील पूल, चिखली येथील नांदनी नदीवरील खेराडे-चिखली पूल आणि येरळा नदीवर असणारा कमळापूर-रामापूर पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच सोनहीरा येथील ओढ्यालाही पूर आला आहे. तर कडेगाव तालुक्यातील अमरापूर येथील नांदनी नदीला आलेल्या पूरामुळे कराड-विटा मार्गावरील एक पूल वाहून गेला आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक बंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे सांगलीतील नद्यांना पूर; अनेक पूल पाण्याखाली - sangli bridge
सांगली शहरासह जिल्ह्यात रविवारी रात्रीनंतर मुसळधार पाऊस पडला आहे. पहाटेपर्यंत पडलेल्या या पाऊसामुळे जिल्ह्यातील कडेगाव आणि खानापूर व कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्ट्यातील नद्यांना पूर आला आहे.
मुसळधार पावसामुळे सांगलीतील नद्यांना पूर
खानापूर तालुक्यातही मुसळधार पावसामुळे येरळा नदीला पूर आल्याने भाळवणी येथील शिरगाव-भाळवणी पुल पाण्या खाली गेला आहे. त्यामुळे याठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे देशिंग मार्गावर असणाऱ्या मोरगाव गावातील अग्रणी नदीवर असणाऱ्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्याचबरोबर मुसळधार पावसाने तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरले आहेत.