महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत विविध मागण्यांसाठी पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - District President of All India Kisan Sabha Umesh Deshmukh

पूर आल्यानंतर उपनगर असणाऱ्या काकानगर, दत्तनगर आणि कर्नाळ रोड असा सर्व परिसर पाण्याखाली आला होता. त्यामुळे येथे वीज, पाणी वापरली गेले नव्हते. तरी देखील वीज वितरण कंपनीकडून पूरग्रस्तांना वीज बिले पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांनी हे वीज बिले व ईतर बिले रद्द करण्याची मागणी केली आहे.

सांगली आंदोलन

By

Published : Sep 4, 2019, 6:10 PM IST

सांगली- पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज सांगली मध्ये आंदोलन करण्यात आले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन काढण्यात आले. महापूर काळातील वीज, पाणी बिल माफ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात शेकडो पूरग्रस्तांनी हजेरी लावली होती.

आंदोलनाबाबत माहिती देताना अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख

पूर आल्यानंतर उपनगर असणाऱ्या काकानगर, दत्तनगर आणि कर्नाळ रोड असा सर्व परिसर पाण्याखाली आला होता. त्यामुळे येथे वीज, पाणी वापरली गेले नाव्हती. तरी देखील वीज वितरण कंपनीकडून पूरग्रस्तांना वीज बिले पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे येथील नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर वीज वितरण कंपनीने पाठवलेली वीज बिले तातडीने रद्द करून एका महिन्यात वीज बिल माफ करावे, तसेच महापालिका प्रशासनाने एक महिन्याची पाणीपट्टी माफ करावी, त्याचबरोबर या परिसरात मोठ्या प्रमाणात महिलांनी मायक्रो फायनांन्स मधून कर्ज घेतलेली आहेत, ती सुद्धा माफ करण्यात यावी, अशी मागणी घेऊन पूरग्रस्तांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

हा मोर्चा कर्नाळ रोड ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला होता. अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details