महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ब्रम्हनाळचे पूरग्रस्त मदतीपासून वंचितच.. गावकऱ्यांनी काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गेल्यावर्षी आलेल्या महापुराच्या कचाट्यात सापडलेल्या पूरग्रस्तांना अद्याप राज्य शासनाकडून मदत मिळाली नाही. यात सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांचाही समावेश आहे. ब्रम्हनाळ गावात नाव उलटून १४ जणांचा मृत्यू झाला होता.

सांगलीतील पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा
सांगलीतील पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा

By

Published : Jan 29, 2020, 11:26 AM IST

सांगली - गेल्या वर्षी आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली मदत अद्याप न मिळाल्याने पूरग्रस्तांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

सांगलीतील पूरग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा

सांगली जिल्ह्यात जुलै-ऑगस्ट २०१९ मध्ये महापूर आला होता. या महापुराचे पाणी अनेक गावांमध्ये शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथील अनेक पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नाही. त्याचबरोबर गावातील अनेक नागरिकांचे पंचनामेसुद्धा झालेले नाही. जे पंचनामे झाले, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे ब्रह्मनाळ गावातील ग्रामस्थांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

हेही वाचा - सांगली : अमित शाह यांची आज तासगावमध्ये प्रचार सभा

यावेळी प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवण्यात येत असून, त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे, असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

हेही वाचा - सांगलीतील काँग्रेस गेल्या निवडणुकीत संपली, यंदाच्या निवडणुकीत चिन्हही गायब झाले - माधव भंडारी

ABOUT THE AUTHOR

...view details