महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भर पावसात जत पोलिसांनी काढला 'फ्लॅग मार्च'; चिमुकल्यांसह नागरिकांनी दिली पोलिसांना मानवंदना - SANGALI POLICE

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले आणि उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जत शहरातून फ्लॅग मार्च काढण्यात आला.

'Flag march' by jat police in heavy rains
भर पावसात जत पोलिसांनी काढला 'फ्लॅग मार्च'; चिमुकल्यांसह नागरिकांनी दिली पोलिसांना मानवंदना

By

Published : Apr 19, 2020, 4:48 PM IST

सांगली - 'सदरक्षणाय, खल निग्रहनाय' हे ब्रीद उराशी बाळगून महाराष्ट्र पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. कुठल्याही प्रसंगात सर्वात अगोदर रस्त्यावर उतरतात ते पोलीस. त्यांच्या वाटेला कुठला सण किंवा उत्सव येत नाही. गणेशोत्सव दिवाळी ईद यासह अन्य सभा-समारंभ काळात कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी त्यांना घर, नातेवाईक यांचा त्याग करावा लागतो.

भर पावसात जत पोलिसांनी काढला 'फ्लॅग मार्च'; चिमुकल्यांसह नागरिकांनी दिली पोलिसांना मानवंदना
दंगलीत घुसावे लागते कोरोना सारख्याच जीवघेण्या प्रसंगात सुद्धा पोलीसच लढत आहे. तो रस्त्यावर असल्याने अन्य यंत्रणा शांत डोक्याने काम करून कोरोनाला हरवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले आणि उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जत शहरातून फ्लॅग मार्च काढण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक दुबुले यांनी तिरंगा ध्वज आणि उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे 'पोलीस ध्वज' घेतला होता. जत एसटी आगारातून महाराणा चौक, गांधी चौक, वाचनालय चौक, संभाजी चौक, शिवाजी पेठेत भर पावसात राष्ट्रगीत गाण्यात आले.यावेळी ८ अधिकारी ४५ पोलीस कर्मचारी, २२ होमगार्ड आणि बँड पथक सहभागी झाले होते. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट करत वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वीज खंडित होती. अशावेळी पोलिसांच्या निघालेल्या फ्लॅग मार्चमुळे वातावरण भरून गेले. महाराणा प्रताप चौकात एका चिमुकल्याने पोलिसांना मानवंदना दिली. नागरिकांनी गॅलरी गच्चीवरून टाळ्या वाजवून भारत माता की जय अशा घोषणा देऊन पोलीस दलास मनपूर्वक सलामी दिली. या भावुक प्रसंगाने पोलिसांचे मन हेलावले.

ABOUT THE AUTHOR

...view details