सांगली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरज जंक्शनमधून रवाना होणाऱ्या काही रेल्वे आता रद्द झाल्या आहेत. 20 मार्चपासून 31 मार्चपर्यंत या रेल्वे रद्द करण्यात आले आहेत. प्रवाशांची घटलेली संख्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून या गाड्या रद्द करण्यात आले आहेत.
मिरजेतून सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि कर्नाटकाकडे जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून रेल्वे प्रशासनाने 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.