महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीचे साहित्य चोरी करणारी टोळी गजाआड, पाच जण अटकेत - विटा गुन्हे बातमी

शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. विटा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

vita crime news
vita crime news

By

Published : Jul 14, 2020, 8:38 PM IST

सांगली - शेतकऱ्यांच्या शेतातील साहित्य चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. विटा पोलिसांनी पाच जणांना अटक करत त्यांच्याकडून सुमारे दीड लाखांच्या मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये शेतातील विहिरीवरील मोटर आणि एचटीपी यंत्रे हस्तगत करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर चोरट्यांचे संकट निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून खानापूर, आटपाडी आणि कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवर असणाऱ्या मोटारी तसेच औषध फवारणीचे एचटीपी यंत्र चोरीचे प्रकार घडले होते.

याबाबत विटा पोलिसांची गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून कडेगावच्या कडेपूर येथील विशाल उर्फ विकास महिंद आणि विटा येथील गांधीनगरच्या सागर उर्फ प्रणय जाधव या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. यामध्ये दोघांनी विटा येथील गांधीनगरमधील एका शेतातील मोटर, इंजिन आणि एचीटीपी यंत्र चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना अटक करत अधिक चौकशी केली.

त्यानंतर, दोघांचे साथीदार तात्यासो जाधव,
विकास पवार आणि रुचिक साळुंखे यांच्या बरोबर आणखी शेतीची साहीत्य चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर विटा पोलिसांनी तिघांनाही अटक करत त्यांच्याकडील ६ विहिरीवरील मोटर, ६ औषध फवारणी करण्याचे एचटीपी यंत्र, चोरीत वापरण्यात आलेली ३ दुचाकी वाहने, असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी त्यांच्याकडून चोरीचे ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीने विटा, गांधीनगर, वडिया रायबाग, खेराड वांगी आणि आंबेगाव याठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतीची साहित्य चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details