महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गो कोरोनो गो: इस्लामपूरच्या 'त्या' पहिल्या 4 बाधितांसह 14 जणांचा अहवाल 'निगेटिव्ह' - कोरोना व्हायरस बातमी

जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग, प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर या चौघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सांगलीच्या कोरोना रुग्णांचा आकडा आता घटून २१ झाला आहे. सांगली जिल्हा हा कोरोना मुक्तीच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

first-4-positive-corona-cases-now-negative-in-islampur
first-4-positive-corona-cases-now-negative-in-islampur

By

Published : Apr 5, 2020, 9:57 AM IST

सांगली- सांगलीच्या इस्लामपूर मधील पहिल्या चार कोरोना बधितांसह १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधितांसह १५ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले. यामध्ये १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून यामुळे प्रशासान आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा-#Corona: कल्याण-डोंबिवलीत आणखी तीन रुग्ण; सहा महिन्यांचे बाळही 'पॉझिटिव्ह'

सांगलीच्या इस्लामपूर येथील चार जण सौदी अरेबियातील उमराह येथून देवदर्शन करुन १४ मार्च रोजी परतले होते. त्यानंतर या चौघांना १९ मार्च रोजी प्रशासनाने ताब्यात घेत, मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आयसोलेशन कक्षात ठेवले. त्यानंतर या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्याने संपूर्ण जिल्हा आणि प्रशासना हादरुन गेले होते. तर १४ ते १९ मार्च दरम्यान त्या चार जणांच्या संपर्कात सुमारे ४०० हून अधिक जण आल्याचे समोर आले होते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली होती. तातडीने या सर्वांचा शोध घेऊन यातील संशयित आणि जवळच्या संपर्कात असणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. काही जणांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन, तर काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले. यानंतर त्यापैकी त्यांच्या कुटुंबातील जवळच्या अशा २२ जणांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आले होते. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील एक महिलेचा तर दोन वर्षांच्या बाळासह एका लहान मुलीचा समावेश होता. त्यामुळे राज्य सरकार सुद्धा हादरुन गेले होते.

या सर्व २६ जणांच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी यापैकी सौदी अरेबियामधून जे पाहिले चार जण आले होते. ज्यांच्यामुळे कोरोनाची साखळी तयार झाली. त्यांचा शनिवारी १४ दिवसांचा उपचार कार्यकाळ पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाकडून स्वॅब नमुने घेण्यात आले. मात्र, त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. २४ तासानंतर या चौघांची आणखी एक टेस्ट घेण्यात येणार असून ती टेस्ट निगेटिव्ह आली तर त्यांना डिस्चार्ज करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तर त्या चौघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी ११ जणांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. त्याचा अहवालही निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील पहिल्या कोरोना बाधित चौघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभाग, प्रशासन आणि सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर या चौघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सांगलीच्या कोरोना रुग्णांचा आकडा आता घटून २१ झाला आहे. सांगली जिल्हा हा कोरोना मुक्तीच्या दिशेने जाण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details