सांगली - शहरातील एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला भीषण ( Fire Furniture and Scrap Shop ) आग लागली. जुन्या कुपवाड रोडवरील असणाऱ्या दुकानाला अचानकपणे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. तसेच शेजारी असणाऱ्या तीन घरांनाही या आगीची झळ बसली आहे. मात्र ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. शर्थीचे प्रयत्न करत अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
Scrap Shop Fire Sangli : भंगार दुकानाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही - कुपवाड रोडवरील दुकानाला आग
एका जुन्या फर्निचर व भंगार दुकानाला दुपारच्या सुमारास अचानक पणे आग लागली. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जुने लाकडी फर्निचर व इतर साहित्य असल्याने आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. ज्यामुळे याची झळ शेजारच्या तीन घरांना देखील बसली.
भंगाराला लागलेली आग
Last Updated : Apr 4, 2022, 4:05 PM IST