महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात - सांगली प्लास्टिक गोडाऊन आग

सांगलीमध्ये मारुती रोडवरील एका गोडाऊनला लागलेल्या आगीत गोडाऊनसह चार दुकाने भस्मसात झाली आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Fire at Plastic Godown in Sangli

By

Published : Oct 28, 2019, 1:00 AM IST

Updated : Oct 28, 2019, 2:23 AM IST

सांगली -शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या मेहता जनरल स्टोअर्सच्या गोडाऊनला रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मेहता स्टोअर्स सह आजूबाजूची चार दुकाने भास्मसात झाली. आग इतकी भीषण होती की, या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी तब्बल आठ अग्निशमन गाड्यांना पाचारण करावे लागले. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू होते.

ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात

मारुती रोडवरील आंनद टॉकीज समोर असणाऱ्या मेहता स्टोअर्स हे प्लास्टिक साहित्य विक्रीचे दुकान आणि मागील बाजूला गोडाऊन आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास या गोडाऊन मधून धूर येऊ लागला आणि अचानक आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती, की यामध्ये मेहता स्टोअर्सच्या गोडाऊनसह बाजूची एक बेकरी आणि 2 मोठी दुकाने भास्मसात झाली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

Last Updated : Oct 28, 2019, 2:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details