सांगली - तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सांगली जिल्ह्यातले कोरोनाचे चित्र संपुष्टात आल्याचे पाहायला मिळाले. रविवारी अखेर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ही शून्यावर ( Corona patients number in Sangli reached zero ) पोहचली. त्यामुळे, सांगलीकर आणि जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा -Ahilya Devi Holkar Memorial : फ्लावर समझे क्या फायर है हम! सलगर यांची पडळकरांवर टीका
देशात कोरोनाची लाट सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण सापडले. त्यानंतर सांगली जिल्हा महाराष्ट्रातील कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. इतकेच नव्हे तर, महाराष्ट्रातील मृत्युदराच्या हिटलिस्टमध्येही सांगली जिल्हा पोहचला होता. कोरोनाच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्येही रुग्णसंख्या सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. मात्र, आता सांगली जिल्ह्यावर असणारे कोरोनाचे संकट संपुष्टात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
रविवार 3 एप्रिल हा दिवस सांगलीकरांच्या दृष्टीने आनंददायी ठरला आहे. जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण रविवार अखेर सापडलेला नाही. त्यामुळे, कोरोना रुग्णसंख्या शून्यावर पोहचली, तर उपचाराखाली देखील एकही रुग्ण नसल्याने जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला. दोन वर्षांच्या कालावधीत पहिल्यांदाच, अशा प्रकारची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
एक नजर टाकूया, 2 वर्षांतील कोरोना आकडेवारीवर