सांगली - विवाहित महिलेला शारीरिक, मानसिक त्रास देणे तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील वळसंग येथील प्रकार असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेच्या छळप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल - जत तालुका
जत तालुक्यातील वळसंग येथील रणजित प्रकाश फल्ले या तरुणासोबत 2015 ला सरोजिनी हिचा विवाह झाला. मात्र सासरच्या मंडळींकडून वारंवार तिला त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून सासरच्या मंडलीविरोधात हुंडा बळी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![महिलेच्या छळप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल जत पोलीस ठाणे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-02:49:07:1619342347-filenamemh10020-sng-03-imge-01-4-22042021210104-2204f-1619105464-68.jpg)
जत तालुक्यातील वळसंग येथील रणजित प्रकाश फल्ले या तरुणासोबत 2015 ला सरोजिनी हिचा विवाह झाला. मात्र सासरच्या मंडळींकडून वारंवार तिला त्रास दिला जात होता. “मोबाईल दुकान टाकण्यासाठी माहेरून 4 लाख रुपये घेऊन ये, तुला जेवण तयार करता येत नाही, तुझ्यामुळे आमच्या घरात भांडण होत आहे, ठरल्याप्रमाणे लग्नात योग्य तो मान-पान केला नाही” असे बोलून तिला मानसिक त्रास दिला जायचा. तसेच शिवीगाळ करत उपाशी ठेवत शारीरिक त्रास देण्यात आला. या त्रासाला कंटाळून सासरच्या मंडलीविरोधात हुंडा बळी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पती विजय, सासरे प्रकाश, सासू सुरेखा, दिर रोहित व जाऊ अश्विनी फल्ले यांचा समावेश आहे.