सांगली -वाढीव वीज बिलाविरोधात सांगलीमधून तब्बल पन्नास हजार हरकती मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना पाठवण्यात आल्या आहेत. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने वीज ग्राहकांकडून जमा करण्यात आलेल्या या हरकतींचे अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. राज्य सरकारने या हरकतींची दखल घेऊन वाढीव वीज बिले माफ करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
वाढीव वीज बिल विरोधात सांगलीत तब्बल पन्नास हजार हरकती, जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द - सांगली जिल्हाधिकारी बातमी
आंदोलनाच्या माध्यमातून सांगली महापालिका क्षेत्रासह मिरज तालुक्यातील वीज ग्राहकांना या वाढीव वीज बिलांच्या बाबतीत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सांगली महापालिका क्षेत्रासह मिरज तालुक्यातील तब्बल 50 हजार ग्राहकांनी या बिलाला विरोध करत हरकती नोंदवले आहेत. वीज ग्राहकांच्याकडून जमा केलेल्या या हरकती सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पाठवण्यात आल्या आहेत.
वाढीव वीज बिल विरोधात सांगलीत तब्बल पन्नास हजार हरकती
सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे या पन्नास हजार हरकती सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने सुपूर्द करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटात पाठवण्यात आलेली ही वाढीव वीज बिल सर्वसामान्य नागरिकांच्यावर अन्याय करणारी असल्याचा नमूद करत 300 युनिटपर्यंत सरसकट वीजबिल माफ करावी, अशी मागणीही यावेळी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.