महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत १५ कोरोना रुग्णांची वाढ; महापालिका क्षेत्रातील ८ जणांचा समावेश - 15 news patient in sangli

सांगलीमध्ये शनिवारी आणखी १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ८ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या ३१० आहे.

sangli corona update
सांगली कोरोना अपडेट

By

Published : Jul 12, 2020, 10:40 AM IST

सांगली -जिह्यात शनिवारी दिवसभरात १५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ८ जणांचा समावेश आहे. तर उपचार घेणारे ७ जण कोरोना मुक्त झाले आहेत. शनिवारी सांगलीतील कोरोनाचा १७ वा बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या ३१० असून कोरोना रुग्णांची संख्या ६३२ झाली आहे. यापैकी ३०५ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सांगली जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी आणखी १५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील ८ जणांचा समावेश असून उपचार घेणाऱ्या एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.कडेगाव तालुक्यातील भिकवडे येथील ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या १७ झाली आहे.

कोरोनाबाधित झालेल्यामध्ये जत तालुक्यातील बिळूर ३ , कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची १ , मिरज तालुक्यातील कर्नाळ १ , कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द १ आणि कडेगाव शहर १ यांचा समावेश आहे.

सांगली महापालिका क्षेत्रातील ८ जणांना कोरोना लागण झाली आहे.यामध्ये सांगली शहरातील ५ जण असून यामध्ये खणभाग भांडवली गल्ली १,वारणाली येथील १,कृष्णाई वसाहत १,दत्त नगर १,अन्य १ . मिरजेतील ३ जणांचा समावेश आहे. या १५ जणांवर मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचार घेणारे ७ जण हे शनिवारी कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देऊन इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन मध्ये पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ३१० झाली आहे. जिल्ह्यात आता पर्यंत एकूण ६३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details