सांगली- मुलगी जन्मल्यानंतर फुले व पायघड्या घालून तिचा 'गृहप्रवेश' केल्याची अनोखी घटना वाळवा तालुक्यात समोर आलीय.
फुलांच्या पायघड्या घालून मुलगी व पत्नीचा 'गृहप्रवेश', सांगलीतील घटना - daughter born in sangli
मुलगी जन्मल्यानंतर फुले व पायघड्या घालून तिचा 'गृहप्रवेश' केल्याची अनोखी घटना वाळवा तालुक्यात समोर आलीय.
सध्या समाजात मुलींवरील वाढत्या अत्याचारांमुळे मुलगी जन्माला येणे म्हणजे एक प्रकारे मोठे संकट असल्याचे काही पालकांना वाटत आहे. तर मागील काही वर्षांपासून मुलींवरील होणारे हल्ले व फसवणूक यामुळे कित्येक मुलींनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तर, काही मुली शिक्षण सोडून घरी बसल्याचे चित्र आहे. तर मुलगी झाली म्हणून सासू-सासरे व नवऱ्याने सुनेला घरा बाहेर काढल्याच्या घटना आजही समोर येतात. मात्र मुलगी झाल्याने फुलांच्या पायघड्या घालून जक्राईवाडी येथील माने कुटुंबीयांनी आनंदोत्सव साजरा केलाय.
वाळवा तालुक्यातील जगदीश माने होमगार्ड म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा विवाह कोल्हापुरातील ज्योती यांच्याशी २०१९ मध्ये झाला. काही दिवसांनंतर ज्योती बाळंतपणासाठी माहेरी गेल्या. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी मुलीला जन्म दिला. यानंतर पुन्हा जक्राईवाडी येथे सासरी परतल्यानंतर पती जगदीश माने यांनी दोघांचे औक्षण केले. फुलांच्या पायघड्या घालून मायलेकीचा गृहप्रवेश करण्यात आला. यामुळे माने कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.