महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे रखडलेलेही काम सुरू करा; वाळावा तालुक्यातील बळीराजा पाण्याच्या प्रतीक्षेत. - वाकुर्डे पाटबंधारे योजनेचे काम

वाळावा तालक्यातील याकुर्डे योजनेच्या पहिल्या टप्प्यातील उर्वरित कामाला सुरुवात केली आहे. मात्र, ढगेवाडी जक्राईवाडीच्या शेतीला पाणी कधी मिळणार? त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील कामाचीही सुरुवात करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.

wakurde irrigation schemes
वाकुर्डे बुद्रुक योजनेचे रखडलेलेही काम सुरू करा;

By

Published : Oct 23, 2020, 11:08 AM IST


वाळवा(सांगली)- तालुक्यातील "वाकुर्डे बुद्रुक" योजनेचे काम कारवे-ढगेवाडी तलावा दरम्यान पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता पुढील कामाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, या योजनेचा दुसरा टप्पा पूर्णत्वास गेल्यानंतर जवळपास ७० टक्के शेती ओलिताखाली येणार आहे. मात्र, तो दिवस कधी पाहायला मिळणार? या अपेक्षेवर बळीराजा वाट पाहत आहे.

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम सुरू करून ते पूर्णत्वास नेण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात होती. त्या मागणीनंतर संबंधित विभागाने तत्काळ या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, टप्पा क्रमांक १ मधून ऐतवडे बुद्रुक गावचे सत्तर टक्के क्षेत्र वंचित राहणार आहे. जर पहिल्या टप्प्यात ऐतवडे बुद्रुक गावचे एकूण क्षेत्र ३२०० एकरापैकी २ हजार ८०० एकर क्षेत्र बागायत होणार आहे. या योजनेत ऐतवडे बुद्रुक फाटा उत्तरेकडील भाग ३० टक्के समाविष्ट होऊन ओलिताखाली येणार आहे. उर्वरित ७० टक्के क्षेत्र वंचित राहणार आहे. त्यावर टप्पा क्रमांक २ मधून उर्वरित ७० टक्के क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी पाटबंधारे विभाग आणि सरकारकडून आश्‍वासन दिले होते. परंतु या कामाबाबत अद्याप कोणतीही हालचाल दिसून येत नाही. त्याही टप्प्याचे काम लवकारात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी भुईपाटाणे मिळणार होते, तसे शिराळा मतदारसंघातील गावात झालेल्या बैठकीत सांगण्यात आले होते. सन १९९५-९६पासून झालेल्या विधानसभा मतदार संघात निवडणूक प्रचारात या योजनेचे पाणी येणार या प्रतीक्षेत बळीराजा होता. सन १९८५ मध्ये राजारामबापू कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष व विद्यमान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लोकनेते राजारामबापू पाटील यांचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी तालुक्यातील गावागावात पदयात्रा काढली. यातूनच हरित क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी ऐतवडे बुद्रुक येथील एका बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले होते.

वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पहिल्या टप्प्यात ऐतवडे बुद्रुक मधील उत्तरेकडील केवळ तीस टक्के क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तरी उर्वरित ७० टक्के क्षेत्र वंचित राहणार आहे. त्याकरिता आमदार मानसिंगराव नाईक टप्पा क्रमांक दोन मधून राहिलेले ७० टक्के क्षेत्र लवकरात लवकर ओलिताखाली आणण्यासाठी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

ग्राम पंचायतीमध्ये माहितीदर्शक नकाशाची गरज-

शिराळा तालुक्यातील रेड पासून ते वाळवा तालुक्यातील कामेरी पर्यंतच्या टप्पा क्रमांक १ मधील मुख्य जलवाहिनीचे काम ढगेवाडी, कार्वे तलावापर्यंत पूर्ण झाले त्यामधून किती तलावात पाणी पडणार? जलवाहिनीला फाटे किती होणार? कोण कोणत्या गावचे किती क्षेत्र ओलिताखाली येणार? काही गावातील उपसा जलसिंचन योजना आहेत त्या सुरू राहणार का बंद होणार? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी गावागावात ग्रामपंचायतीमध्ये या योजनेचा नकाशा लावावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे शशिकांत शेटे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details