महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संकटकाळात कर्जवसूली करणाऱ्या कंपनीविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक.. - महादेव कोरे शेतकरी संघटना बातमी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे मोठे हाल सुरू आहेत. महिलांनी बचतगट व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्जाचे हप्ते थकले आहेत.

farmers-association-aggressive-against-debt-recovery-companies-in-sangli
संकटकाळात कर्जवसूली करणाऱ्या कंपनीविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक..

By

Published : Jul 9, 2020, 4:56 PM IST

सांगली - कर्ज वसुलीस आलेल्या मायक्रो फायनान्सच्या कर्मचाऱ्यांना चाबकाचे फटके देऊन शेतकरी संघटनेने पिटाळून लावले आहे. सांगलीच्या मिरजमध्ये हा प्रकार घडला आहे. लॉकडाऊनमुळे अडचणीत असणाऱ्या नागरिकांकडून जबरदस्तीने कर्जाच्या हप्त्यांची वसुली सुरू असल्याने शेतकरी संघटनेने हे पाऊल उचलले आहे.

संकटकाळात कर्जवसूली करणाऱ्या कंपनीविरुद्ध शेतकरी संघटना आक्रमक..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांचे मोठे हाल सुरू आहेत. महिलांनी बचतगट व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कर्जाचे हप्ते थकले आहेत. मात्र, कंपनीने अशा काळातही सक्तीने वसुली सुरू केली आहे. सरकारने अशा कंपन्यांना सध्या कर्ज वसून करू नका, असे आवाहन केलेले असताना कंपनीकडून कर्ज वसूली सुरू आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी शेतकरी संघटनेकडे आल्या आल्या आहेत. शेतकरी संघटनेने बाबत आक्रमक भूमीका घेतली असून कर्ज वसून करण्यास आल्यावर चाबकाने फटके देऊ,असा इशारा मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिला होता. मात्र, तरिही या कंपनीचे कर्मचारी कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदारांकडे आले.

शहरातील एक रिक्षाचालक कुटुंब व काही कुटुंबांकडे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन जबरदस्तीने वसुलीचा तगादा लावला. याची माहिती मिळताच शेतकरी संघटनेचे नेते व माजी अध्यक्ष महादेव कोरे हे कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी काही वेळ कर्मचाऱ्यांना घरात कोंडून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना चाबकाचे फटके देऊन शेतकरी संघटनेने पिटाळून लावले. सुमारे एक तास हा सर्व प्रकार सुरू होता.

आज कोरोनामुळे मध्यमवर्गीय कुटुंब मोठ्या अडचणीत आहेत, अशा परिस्थितीमध्ये मायक्रो फायनान्स कंपनीने जबरदस्तीने वसुली सुरू केली आहे. त्यामुळे कर्जदारांवर आत्महत्येची वेळ आली आहे. मात्र, शेतकरी संघटना हा अन्याय खपवून घेणार नाहीत, जबरदस्तीने वसुली करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना यापुढेही चाबकाने फोडून काढू, असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने महादेव कोरे यांनी दिला आहे.

रिक्षा व्यवसाय सुरू असूनही प्रवाशी मिळत नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे कसे बसे दोन वेळचे खाऊन जगत आहे. घरात गॅस संपल्याने आता चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. असे असताना आम्ही कर्जाचे हफ्ते कसे भरणार? असा प्रश्न आहे. याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना पण याची कल्पना देत सवलत मागितली. मात्र, कंपनीकडून वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी कर्जदार महिलेने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details