महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थकीत ऊस बिलासाठी 'केन अॅग्रो ' कारखान्यात शेतकऱ्यांचे अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन - थकीत ऊस बिलासाठी केन ऍग्रो कारखान्यात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन केले आहे. कडेगाव तालुक्यातील केन अॅग्रो (डोंगराई) साखर कारखान्यात हे आंदोलन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांचे अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन

By

Published : Nov 8, 2019, 1:52 PM IST

सांगली- थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन भीक मागो आंदोलन केले आहे. कडेगाव तालुक्यातील केन ऍग्रो (डोंगराई ) साखर कारखान्यात हे आंदोलन करण्यात आले आहे. भाजप आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा हा कारखाना असून गेल्या 2 वर्षांपासून शेतकऱ्यांचे ऊस बिले थकल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.

थकीत ऊस बिलासाठी केन ऍग्रो कारखान्यात शेतकऱ्यांचे आंदोलन

हेही वाचा -अयोद्धेबाबत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करू - कादर मलबारी

सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील रायगाव येथील केन ऍग्रो (डोंगराई ) साखर कारखान्याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आज अनोखे आंदोलन केले आहे. अनेक शेतकऱ्यांचे गेल्या 2 वर्षांपासून ऊसाची बिले थकीत आहेत. मात्र, कारखाना प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने आज संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थेट कारखान्यावर धडक देत आंदोलन केले आहे.

अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांनी यावेळी थेट कारखाना परिसरात भीक मागो आंदोलन केले आहे. आम्ही कसे जगायचे असे उद्विग्न प्रश्न करत, ऊसाची बिले देत नाही तर किमान भीक तरी द्या, अशी विनवणी कारखाना परिसरातील कर्मचारी आणि प्रशासनासमोर शेतकऱ्यांनी केली आहे. भाजपचे आमदार पृथ्वीराज देशमुख यांचा हा कारखाना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details