महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन शेतकरयाची आत्महत्या - Farmer Suicide

सांगली - कर्जाला कंटाळून जत तालुक्यातील येळदरी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अर्जुन देवकाते, असे या शेतकर्‍याचे नाव आहे. राहत्या घरी द्राक्षबागेवर फवारण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून देवकते यांनी आत्महत्या केली आहे. द्राक्ष शेतासाठी देवकते यांनी गावातील काही जणांच्याकडून कर्ज घेतले होते. पण, ते फेडणे अश्यक्य झाल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे.

अर्जुन देवकाते
अर्जुन देवकाते

By

Published : Jun 12, 2022, 4:53 PM IST

सांगली- कर्जाला कंटाळून जत तालुक्यातील येळदरी येथील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अर्जुन देवकाते, असे या शेतकर्‍याचे नाव आहे. राहत्या घरी द्राक्षबागेवर फवारण्यात येणारे विषारी औषध प्राशन करून देवकते यांनी आत्महत्या केली आहे. द्राक्ष शेतासाठी देवकते यांनी गावातील काही जणांच्याकडून कर्ज घेतले होते. पण, ते फेडणे अश्यक्य झाल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे.

बागेसाठी आणलेले औषध पिऊन शेतकऱ्याची आत्महत्या -येळदरी येथील अर्जुन देवकाते ( वय 38 वर्षे ) यांनी आपल्या राहत्या घरी द्राक्ष बागेत फवारण्यात येणारे विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. अर्जुन देवकते यांची शेती असून शेतात त्यांनी द्राक्षबाग उभारण्यासाठी गावातील काही लोकांकडून हातउसने कर्ज घेतले होते. पण, सततच्या नुकसानीमुळे देवकाते यांना कर्ज फेडणे अशक्य झाले होते. त्यामुळे देवकाते यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून देवकाते यांनी बुधवारी (दि. 8 जून) आत्महत्या केली.

घरातील सर्व जण द्राक्ष बागेत औषध फवारणीसाठी गेले होते. त्यावेळी अर्जुन देवकाते यांनी द्राक्षबागेत फवारण्यासाठी असणारे विषारी प्रशान केले. दरम्यान, संध्याकाळी त्यांची मुलगी घरी आली असता, तिला आपण विष पिल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीने नातेवाईक बोलवून तातडीने देवकाते यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. देवकाते यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा, असा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा -Collector Assault : महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला

ABOUT THE AUTHOR

...view details