महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतातील मोटार काढण्यासाठी गेलेला शेतकरी कृष्णेच्या महापुरात गेला वाहून - farmer

राम जाधव यांच्या बरोबर दत्तात्रय सावंत आपल्या म्हैसाळ येथील कृष्णा नदीच्या काठी असलेल्या शेतामध्ये विहिरीतील मोटार काढण्यासाठी गेले होते. दरम्यान दत्तात्रय सावंत व राम जाधव हे दोघेही कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले.

दत्तात्रय सावंत

By

Published : Aug 7, 2019, 7:27 AM IST

सांगली- जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीला महापुर आला आहे. यावेळी मिरजेच्या म्हैसाळ येथील कृष्णा नदीत एक जण वाहून गेला तर दुसरा बचावला आहे. दत्तात्रय सावंत असे पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

शोधकार्य करताना बचाव पथक

राम जाधव यांच्या बरोबर दत्तात्रय सावंत आपल्या म्हैसाळ येथील कृष्णा नदीच्या काठी असलेल्या शेतामध्ये विहिरीतील मोटार काढण्यासाठी गेले होते. दरम्यान दत्तात्रय सावंत व राम जाधव हे दोघेही कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले. मात्र यावेळी राम जाधव बचावले, पण सावंत पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी सावंत यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली. मात्र पाण्याची वाढती पातळी आणि वेगामुळे शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. दरम्यान सावंत यांना दिवसभर शोधण्यात आले, मात्र त्यांचा अद्याप पत्ता लागला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details