सांगली -आष्टा येथील सोमलिंग तळ्याच्या परिसरात असणाऱ्या उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली आहे, या घटनेमध्ये एका शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा होरपाळून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. शिवाजी रामचंद्र चव्हाण (वय ६५) असे या मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
आष्ट्यात उसाला आग, शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा मृत्यू - Sangli District News Update
आष्टा येथील सोमलिंग तळ्याच्या परिसरात असणाऱ्या उसाच्या शेताला आग लागल्याची घटना घडली आहे, या घटनेमध्ये एका शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा होरपाळून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.
आष्ट्यात उसाला आग, शेतकऱ्यासह दोन शेळ्यांचा मृत्यू
शेळ्या वाचवण्यासाठी गेला होता शेतकरी
दरम्यान उसाच्या शेताला आग लागल्याचे लक्षात येताच, शिवाजी चव्हाण हे शेतात असलेल्या आपल्या शेळ्या वाचवण्यासाठी गेले होते, मात्र दुर्दैवाने त्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबतच दोन शेळ्यांचा देखील होरपाळून मृत्यू झाला. दरम्यान या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.