सांगली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील ऐतिहासिक ख्वाजा मिरासाहेब दर्गा उरूस यंदा खंडित झाला आहे. तसेच संगीत महोत्सवसुद्धा रद्द झाले आहे. यंदाचे हे ६४५ वर्ष आहे. मात्र, प्रशासनाने उरुसाला परवानगी नाकारत दर्गा परिसरात १४४ कलाम लागू केले आहे. त्यामुळे भाविकांना यंदा उरुसमध्ये सहभाग घेता येणार नाही.
सांगलीच्या मिरजेतील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला प्रसिद्ध ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा उरूस 20 मार्चपासून सुरू झाला आहे. मात्र, यंदा या उरुसाची परंपरा खंडित झाली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदाच्या दर्गा उरुसाला परवानगी नाकारली आहे. महापालिका प्रशासनानेही अधिकारी स्टॉल विक्रेते, खेळणे व्यवसायिकांना परवानगी दिली नाही. तर, ३१ मार्चपर्यंत भाविकांना दर्गाप्रवेश बंदी करण्यात आली आहे.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून मिरजेचा ख्वाजा शमना मिरासाहेब दर्गा संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या प्रसिद्ध दर्ग्याचा आज 20 मार्च पासून ६४५ वा उरूस सुरू झाला आहे. दरवर्षी या उरुसाच्या निमित्ताने देशाच्या कानोकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी मिरजेत उपस्थितीत होतात. हा उरूस १५ दिवस चालतो. मात्र, यंदा या उरुसाची परंपरा खंडित झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, उरुसाच्या निमित्ताने मोठी गर्दी होऊन, हा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. यामुळे जिल्हा प्रशासनाने यंदाच्या उरुसाला परवानगी नाकारली असून दर्गा परिसरात १४४ कलाम लागू केले व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.