सांगली - अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना मिरजमध्ये घडली होती. अरुण शिवाजी माळी असे यातील आरोपीचे नाव आहे. सांगली जवळ कवलापूर याठिकाणी हा खुनाचा प्रकार घडला होता. खून करून मृतदेह हा नदीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता.
अनैतिक संबंध उघड होतील या भीतीनेच त्याने केला होता अल्पवयीन मुलाचा खुन - SANGLI POLICE
अनैतिक संबंध उघड होण्याच्या भीतीने अल्पवयीन मुलाचा खून केला होती. खून करून मृतदेह हा नदीत फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. अखेर या प्रकरणाचा निकाल आता लागला आहे.

मिरज तालुक्यातल्या कवलापूरमध्ये केवळ आपले अनैतिक संबंध उघड होतील, या भीतीने संबंधित महिलेच्या अल्पवयीन पुतण्याचा खून केल्याचा प्रकार घडला होता. आरोपीचे मृताच्या काकूशी अनैतिक संबंध होते. संबंध उघड होतील या भीतीपोटी आरोपीने त्या अल्पवयीन मुलाला कवलापूरला नेऊन त्याच्या डोक्यात बांबूने जबर घाव घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अरुणने मृतदेह एका पोत्यात घालून मोरणा नदीमध्ये फेकून दिला होता. या प्रकरणी सांगली न्यायालयाने अरूण माळी याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
सांगली जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी(19 ऑक्टो) या खटल्याची सुनावणी पार पडली आहे. आरोपी अरुण माळी याच्या विरोधात असणाऱ्या सबळ पुराव्यावरून न्यायालयाने याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.