महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिरडीवर झोपलेल्या सरकारने जागे व्हावे, सदाभाऊ खोतांचा आंदोलनातून सरकारला इशारा

सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर येथील आपल्या गावात सहकुटुंब "माझे अंगण हेच रणांगण" आंदोलन केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर शेतकरी प्रश्नावर जोरदार निशाणा साधत, इशारा दिला आहे.

Bhau
आंदोलन करताना सदाभाऊ खोत

By

Published : May 15, 2020, 2:53 PM IST

सांगली- शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, खरिपासाठी तात्काळ कर्ज द्या, यासह विविध मागण्यांसाठी आज माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करण्यात आले आहे. 'माझ अंगण हेच रणांगण' या आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर शेतकरी प्रश्नावर जोरदार निशाणा साधत, इशारा दिला आहे. आपल्या कुटुंबासह अंगणात उभे राहून खोत यांनी हे आंदोलन केले.

तिरडीवर झोपलेल्या सरकारने जागे व्हावे, सदाभाऊ खोतांचा आंदोलनातून सरकारला इशारा

संचारबंदीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. उभ्या शेतातील माल आधीच वाया गेला आहे. आता पुढच्या खरीप हंगामात पीक कसे घ्यायचे यासह शेतकऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. शेतकऱ्यांच्या या विविध प्रश्नांना घेऊन माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आज आंदोलन केले आहे. खोत यांनी पुकारलेल्या "माझे अंगण हेच रणांगण "या आंदोलना शेतकऱ्यांना मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्यातील मरळनाथपूर येथील आपल्या गावात सहकुटुंब आंदोलन केले आहे. हातात शेतकरी मागण्यांचे फलक घेऊन खोत यांनी सहभाग घेतला होता.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, बी-बियाणे उपलब्ध करून घ्यावे, दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे, यासह विविध मागण्या करत, हे सरकार तिरडीवर झोपलेले असून आज शेतकरी, कामगार भुकेने मरत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तिरडीवरून उठत कोरोनाचा बुरखा बाजूला करत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी माजी कृषी राज्य मंत्री खोत यांनी यावेळी केली आहे. आजच्या या शेतकऱ्यांच्या आंदोलनात गावातील ग्रामस्थांनीही सोशल डिस्टन्स पाळत सहभाग घेतला. संचारबंदीतील या पहिल्या राज्यव्यापी अनोख्या आंदोलनाचा आढावा घेत सदाभाऊ खोत यांच्याशी बातचीत केली आहे, सांगलीचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details