सांगली- ईव्हीएम हटाव मागणीसाठी ईव्हीएम कृती समितीकडून शहरात बुधवारी 'जोडे मारो' आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीकडून स्टेशन चौकात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन फलकाला जोडे मारत निदर्शने करण्यात आली.
सांगलीत ईव्हीएम हटाव कृती समितीतर्फे जोडे मारो आंदोलन; ईव्हीएम मशीन हटविण्याची मागणी
ईव्हीएम मशीन विरोधात सांगलीमध्ये ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्यात आले.
ईव्हीएम मशीन विरोधात सांगलीमध्ये ईव्हीएम हटाव कृती समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून ईव्हीएम विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर समितीतर्फे आज शहरातल्या स्टेशन चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली व लोकांची जनजागृती करण्यात आली. यावेळी ईव्हीएम मशिन हटविण्याची मागणी करत समितीतर्फे ईव्हीएम मशीनच्या प्रतिकात्मक फलकाला जोडे मारण्यात आले. निवडणूक आयोगाने सर्व स्तरातून ईव्हीएम मशीनला होणारा विरोध लक्षात घेता आगामी निवडणूक ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी ईव्हीएम हटाव कृती समितीतर्फे मागणी करण्यात आली. या आंदोलनात सांगलीतील विविध पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला होता.