सांगली - जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराचा झंझावात शनिवारी संपला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रॅली, पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांनी आपल्या प्रचाराची सांगता केली. मात्र, जाहीर प्रचार संपल्याने आता छुप्या प्रचारावर भर दिला जाईल.
सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. मागील 14 दिवसांपासून भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बंडखोर अपक्ष उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर या बड्या नेत्यांनी युतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या.