महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

VIDEO : शिकारी श्वानांच्या मदतीने बिबट्याला लावले पळवून, आठ जणांवर गुन्हे दाखल - बिबट्याला कुत्र्यांच्या मदतीने लावले पळवून

कवठेमहांकाळच्या अलकुड एम या ठिकाणी बिबट्याच्या मागे शिकारी कुत्र्यांसह पाठलाग केल्याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात वन विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या तरुणांची वन विभागाकडून चौकशीही करण्यात आली आहे.

fleeing a leopard with the help of hounds
fleeing a leopard with the help of hounds

By

Published : Jun 19, 2021, 9:17 PM IST

Updated : Jun 19, 2021, 9:23 PM IST

सांगली - कवठेमहांकाळच्या अलकुड एम या ठिकाणी बिबट्याच्या मागे शिकारी कुत्र्यांसह पाठलाग केल्याप्रकरणी 8 जणांच्या विरोधात वन विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या तरुणांची वन विभागाकडून चौकशीही करण्यात आली आहे.

शिकारी श्वानांच्या मदतीने बिबट्याला लावले पळवून
पाठलाग करून बिबट्याला लावले पळवून -मिरज तालुक्यातील दंडोबा परिसरात 13 जून रोजी बिबट्या व त्याच्या बछड्याचे दर्शन झाले होते. यानंतर सदर बिबट्या व त्याच्या बछड्याचे कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एम याठिकाणी दर्शन झाले होते. यावेळी याठिकाणी काही तरुणांना शिकारी कुत्री घेऊन बिबट्या व बछड्यांचा पाठलाग केला होता. अलकुड येथून काही अंतरापर्यंत हा पाठलाग केल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याबाबतीत प्राणीमित्रांनी आक्षेप नोंदवला होता.

तर सदर व्हायरल व्हिडिओची वन विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. याबाबत वन विभागाकडून अलकुड येथील 8 तरुणांच्या विरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तसेच सदर संशयित तरूणांना ताब्यात घेत चौकशी केली आहे. शिकारी कुत्र्यांसोबत नेमके त्याच वेळी ते कसे होते. तसेच काय उद्देश होता, याबाबत चौकशी केली असता, बिबट्याला पळवून लावण्यासाठी कुत्र्यांना घेऊन पाठलाग केल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

Last Updated : Jun 19, 2021, 9:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details