सांगली- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. 5 मे मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना रोखण्यासाठी 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन
सोमवारी (दि. 3 मे) जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 568 वर पोहोचली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट करत, प्रशासनाशी चर्चा करून सांगली जिल्ह्यात 5 मे रोजी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.