महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Food Poisoning Case : विद्यार्थी विषबाधा प्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिले चौकशीचे आदेश - पोषण आहारातून विषबाधा

शहरातील वानलेसवाडी येथील खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारातून झालेली विषबाधा घटनेची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. चौकशी नंतर पोषण आहार ठेकेदारावर कडक कारवाईचे करु अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.

Investigation Of Food Poisoning Case
विद्यार्थी विषबाधा प्रकरणी शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिले चौकशीचे आदेश

By

Published : Jan 29, 2023, 6:14 PM IST

सांगली - दोन दिवसांपूर्वी वानलेसवाडी येथील एका खासगी शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याचे समोर आले होते. पोषण आहाराचे सेवन केल्या नंतर विद्यार्थ्यांना मळमळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि उलट्यानांचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला होता. या विषबाधा प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. शाळेतील पोषण आहाराच्या तपासणीसाठी संबंधीत विभागाला आदेश देण्यात आले. त्यानुसार पोषण आहाराचे नमुने अन्न व औषध प्रशासनाने घेतले आहेत. त्याचा लवकरच अहवाल प्राप्त होईल,असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिंदे गटाची आक्रमक भूमीका : या प्रकरणी शिंदे गटाच्या युवा सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. विषबाधा कशामुळे झाली हे स्पष्ट होईलच. पण ठेकेदाराचा हलगर्जीपणाही याला कारणीभूत आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची युवा सेनेने कोल्हापुरत भेट घेतली आहे. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आकाश माने, युवा नेते सचिन कांबळे, मनोज भिसे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री केसरकर यांच्याकडे केली आहे.

कारवाई करण्याचे आदेश : या भेटी बाबत सचिव सचिन कांबळे, मनोज भिसे म्हणाले, मंत्री केसरकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी. प्रसंगी परवाना रद्द करावा,असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत, असेही कांबळे व भिसे यांनी सांगितले.

हेही वाचा -BBC Documentary On Modi : एफटीआयआयमध्ये बीबीसीच्या मोदींवरील 'त्या' डॉक्युमेंटरीचे स्क्रिनिंग

ABOUT THE AUTHOR

...view details