महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Krushna river : दूषित पाण्यामुळे कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी, माशांच्या मृत्यूमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका - Krushna river

वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेटावरील कृष्णा नदीत गेली दोन दिवसांपासून दुषित पाणी मिसळले आहे. यामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावरती तरंगत आहे अशी सध्या स्थिती आहे.

Krushna river
कृष्णा नदीत हजारो मासे मृत्युमुखी

By

Published : Jan 12, 2023, 7:09 PM IST

कृष्णा नदी

सांगली : सध्या मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मृत माशांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मृत माशांचा खच या ठिकाणी पाहायला मिळात आहे. परिणामी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्याही तक्रारी सुरू झाल्या आहेत. वारंवार कृष्णा नदीच्या पात्रामधील माशांच्या मृत्यूमागे काय कारण असेल? तसेच, या घटनेला काय कारण असेल असेही प्रश्न येथे उपस्थित झाले आहेत.

मृत्यूचेही कारण पुढे आले नाही : कृष्णा नदीपात्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये सातत्याने माशांच्या मृत्यूच्या घटना घडत आहेत. अगदी पावसाळ्यात देखील नदी भरून वाहत असतानाही लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यावर प्रदूषण महामंडळाकडून याची दखल घेण्यात आली. मात्र, यानंतरही ठोस कारवाई झाली नाही आणि माशांच्या मृत्यूचेही कारण पुढे आलेले नाही.

माशांचा मृत्यू होत असल्याचा आरोप : कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येणारे दूषित पाणी असेल, तसेच, त्यामुळे होणारा माशांचा मृत्यू असेल, हे सर्व सुरूच असणार आहे. सध्या वाळवा तालुक्यातल्या इस्लामपूर नदीच्या बाहेर रामलिंग बेट या ठिकाणी कृष्ण नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. दोन दिवसांपासून ही घटना सध्या घडत आहे. या ठिकाणी नदीपात्रामध्ये असणारे मासे हे मृत्युमुखी पडले आहेत. नदीपात्रात सोडण्यात आलेल्या दूषित पाण्यामुळे आणि मिसळणाऱ्या मळी मिश्रित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांच्याकडून करण्यात आला आहे.

ठोस भूमिका घ्यावी : नदीपत्रात पडणाऱ्या माशांचा खच मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दुर्गंधिही मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तर वारंवार अशा पद्धतीने कृष्णा नदी पात्रातल्या माशांचा मृत्यू होत असताना, हे मासे नेमके कोणत्या कारणामुळे मरत आहेत, यामागे काय कारण आहे, याचा तपास करून कारवाईसाठी संबंधित प्रदूषण महामंडळाकडून कठोर पावले आणि ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी देखील आता होत आहे.

हेही वाचा : फटाका फॅक्टरी स्फोट प्रकरणात अधिकाऱ्याचा धमाका; तीस हजारांची लाच घेताना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details