विटा (सांगली) - तहसीलदार ऋषिकेष शेळके यांना मारहाण करून फरारी असलेल्या डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व त्याचा साथीदार सागर श्रीमंत सुरवसे यास आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) च्या पथकाने सापळा रचून पडकले.
अखेर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांना अटक - चंद्रहार पाटील तहसीलदार मारहाण प्रकरण
आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे चंद्रहार हा येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आज रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यास पकडले.
दिनांक ३ मे रोजी चंद्रहार पाटील आणि साथीदार सागर सुरवसे यांनी तहसीलदार ऋषिकेष शेळके यांना वाळूचा जादा दंड आकारला म्हणून विटा तहसील कार्यालयाच्या आवारात गाडीत बसत असताना गाडीच्या बाहेर ओढून मारहाण केली होती. याप्रकारानंतर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांच्या शोधासाठी तीन पथके कार्यरत केली होती.
ते दोघे पसार झाल्यापासून त्यांचा पथके शोध घेत होती. परंतु, ते सापडत नव्हते. आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे चंद्रहार हा येणार असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आज रविवारी दुपारी चारच्या सुमारास त्यास पकडले. एलसीबीचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, प्रदीप चौधरी आणि पथकाने ही कामगिरी केली.