महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Crime: गाढव चोरणारी टोळी जेरबंद; चोप देत नागरिकांनी पोलिसांच्या केले स्वाधीन - गाडीचा पाठलाग करत गाडी अडवली

Sangli Crime: गाढव चोरणारया एका टोळीला सांगली पोलिसांनी जेरबंद Sangli Police केले आहे. Sangli Crime चौघांना अटक करत त्यांच्याकडून 9 गाढवे आणि टेम्पो जप्त करण्यात आले आहे. Donkey stealing gang jailed गाढव चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम चोप देत पोलिसांच्याकडे स्वाधीन केले आहे.

Sangli Crime
Sangli Crime

By

Published : Oct 2, 2022, 9:33 PM IST

सांगली: गाढव चोरणारया एका टोळीला सांगली पोलिसांनी जेरबंद Sangli Police केले आहे. Sangli Crime चौघांना अटक करत त्यांच्याकडून 9 गाढवे आणि टेम्पो जप्त करण्यात आले आहे. Donkey stealing gang jailed गाढव चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम चोप देत पोलिसांच्याकडे स्वाधीन केले आहे.

गाढव चोरणारी टोळी जेरबंद

गाडीचा पाठलाग करत गाडी अडवली सांगली आणि मिरज शहारत गेल्या काही दिवसांपासून गाढव चोरण्याचे प्रकार सुरू होते. अखेर गाढव चोरणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात सापडली आहे. कोल्हापूर रोडवर काही लोक गाढव चोरून घेऊन जात असल्याची माहिती गाढव मालक असणारया पिंटू माने यांना मिळाली. त्यांनी तातडीने कोल्हापूर रोडवर धाव घेतली. मात्र त्यापूर्वी चौघांनी टेम्पोमध्ये 9 गाढव घेऊन पलायन केले. त्यानंतर पिंटू माने यांनी गाडीचा पाठलाग करत गाडी अडवली. यावेळी माने यांच्या समाजातील लोक ही त्याठिकाणी पोहचले होते.

चौघांना पोलिसांनी अटक केली यावेळी संतप्त जमावाने गाढव चोरणाऱ्या चौघांना चोप देत सांगली शहर पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रमेश परशु बजंत्री (वय 24), बाळू बजंत्री (वय 26), यमनाप्पा बजंत्री (25), आणि लक्ष्मण गणगोळ (वय 32) सर्व राहणार तेरदाळ, जिल्हा बागलकोट, कर्नाटक या चौघांना पोलिसांनी अटक केली असून चौकशीमध्ये आणखी 11 जणांची नावे निष्पन्न झाले आहे. या टोळीकडून शहरातील गावभाग येथून गाढव चोरल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 9 गाढव आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details