महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्तुत्य उपक्रम..! महाप्रसादाऐवजी गरजूंना वाटला ६ टन भाजीपाला - सामाजिक कार्य

शहरातील खाणभाग येथील सुमारे १५०० हुन अधिक कुटुंबांना घरोघरी जाऊन प्रत्येकी ४ किलो प्रमाणे भाजीपाला वाटप करण्यात आला आहे. या किटमध्ये तीन दिवस पुरेल इतका वेगवेगळया प्रकारचा भाजीपाला आहे. अशा पद्धतीने सुमारे ६ हजार किलो भाजीपाला यावेळी गोरगरीब कुटुंबांना वाटप करण्यात आला आहे. या गरजेच्या मदतीमुळे नागरिकांनीही या स्तुत्य उपक्रमावर समाधान व्यक्त केले.

स्तुत्य उपक्रम..! महाप्रसादा ऐवजी गरजूंना वाटला ६ टन भाजीपाला..
स्तुत्य उपक्रम..! महाप्रसादा ऐवजी गरजूंना वाटला ६ टन भाजीपाला..

By

Published : Apr 26, 2020, 4:45 PM IST

Updated : Apr 26, 2020, 5:32 PM IST

सांगली- राज्यासह देशभरात कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी प्रतिवर्षी साजरा होणारा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचा उत्सव यंदा रद्द करावा लागला. मात्र त्या निमित्ताने जो महाप्रसाद दिला जात होता, त्याऐवजी यावर्षी तब्बल १५०० गरजू कुटुंबांना ६ हजार किलो भाजीपाला वाटप करण्यात आला. सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते गजानन हुलवाने मित्र परिवाराने हा उपक्रम राबवला आहे.

स्तुत्य उपक्रम..! महाप्रसादाऐवजी गरजूंना वाटला ६ टन भाजीपाला

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांना एक वेळच्या भाजीपाला खरेदीची वांदे झाले आहेत. हातावर पोट असणारे लोक मिळणाऱ्या किटवर आपले पोट भरत आहेत. अशा अनेक गरजूंसाठी सांगलीतील सामजिक कार्यकर्ते गजानन हुलवाने व मित्र परिवार धावून आला आहे. हुलवाने मित्र परिवाराकडून दरवर्षी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने महाप्रसाद आयोजित करण्यात येतो. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे तो रद्द झाला. पण हुलवाने व त्यांच्या मित्र परिवाराने या महाप्रसादचे औचित्य साधून आजच्या संचारबंदी काळात महाग झालेला भाजीपाला खरेदी न करू शकणाऱ्या कुटुंबांना मोफत भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

शहरातील खाणभाग येथील सुमारे १५००हून अधिक कुटुंबांना घरोघरी जाऊन प्रत्येकी ४ किलो प्रमाणे भाजीपाला वाटप करण्यात आला आहे. या किटमध्ये तीन दिवस पुरेल इतका वेगवेगळया प्रकारचा भाजीपाला आहे. अशा पद्धतीने सुमारे ६ हजार किलो भाजीपाला यावेळी गोरगरीब कुटुंबांना वाटप करण्यात आला आहे. या गरजेच्या मदतीमुळे नागरिकांनीही या स्तुत्य उपक्रमावर समाधान व्यक्त केले.

Last Updated : Apr 26, 2020, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details