महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुपवाडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; आठ ते दहा जणांचे तोडले लचके,चार वर्षाच्या मुलावर हल्ला - kupawad

मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे कुपवाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे कुपवाड शहरात भीतीचे वातावरण

By

Published : Jul 24, 2019, 7:36 AM IST

Updated : Jul 24, 2019, 8:13 AM IST

सांगली - भटक्या कुत्र्यांनी आठ ते दहा जणांवर हल्ला चढवत चावा घेऊन जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सांगलीच्या कुपवाडमध्ये हा प्रकार घडला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एक चार वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर पालिकेकडून तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे कुपवाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

सांगली महापालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी कुपवाड शहरात एका लहान मुलासह ९ ते १० जणांना चावा घेतला. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वरद रतन व्हनकडे हा चार वर्षाचा बालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या गालाचा लचका कुत्र्याने तोडला. तसेच अनेक महिला, पुरुष यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. यात ओम महादेव व्हनकडे, राहुल जगन्नाथ गवळी, शितल श्रीकांत व्हनकडे, आशा श्रीकांत व्हनकडे यांच्यासह हनुमाननगर व रोहिदास समाज परिसरातील आठ ते दहा जणांचा समावेश आहे.

मोकाट कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने त्याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. गेल्या काही दिवसात भटक्या कुत्र्यांचा संख्येत वाढ झाली आहे.पण महापालिकेची डॉग व्हॅन कुठे आहे ? असा सवाल नागरिकांमध्ये आहे. कुपवाड महापालिका आरोग्य विभाग प्रशासनाकडे अनेकदा विविध संघटनांनी वैयक्तिक निवेदनाद्वारे मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत आहे, तरी महापालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, गेल्या काही दिवसात मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यांमुळे कुपवाड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Last Updated : Jul 24, 2019, 8:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details