पालघर - कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे आलेल्या महापुरामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली असून अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. कित्येक जणांचा मृत्यू या महापुरामुळे झाला आहे. अशा संकटात सापडलेल्या नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदत केली जात आहे. जव्हार तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सांगली तालुक्यातील पूरग्रस्त भागांत नागरिकांसाठी आरोग्य शिबीर राबवले. तेथील नागरिकांची तपासणी करून, त्यांच्यावर योग्य औषधोपचार केले.
जव्हार येथील डॉक्टरांच्या पथकाने पूरग्रस्त सांगलीतील नागरिकांसाठी राबवले आरोग्य शिबीर - palghar news
जव्हार तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सांगली तालुक्यातील पूरग्रस्त भागांत नागरिकांसाठी आरोग्य शिबीर राबवले. तेथील नागरिकांची तपासणी करून, त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार केला. पूरग्रस्त भागातील 10 गावांत जवळपास 2 हजार २०० हून अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
जव्हार येथील डॉक्टरांच्या पथकाने पूरग्रस्त सांगलीतील नागरिकांसाठी राबवले आरोग्य शिबीर
पूरग्रस्त भागांतील 10 गावांत जवळपास 2 हजार 200 पेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करून त्यांच्यावर जव्हार येथून गेलेल्या डॉक्टरांनी उपचार केले. निलेश पटेल यांनी सढळहस्ते मदत करून रुग्णांसाठी अवश्यक औषध पुरवठा केला. संपूर्ण पथकाचा खर्च आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी तसेच जव्हार तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने करण्यात आला. डॉ.संजय लोहार यांच्या नेतृत्वाखाली डॉ पांढरे, डॉ.बेनके, डॉ. केतन सद्गिर यांचा या आरोग्य तपासणी पथकात समावेश होता.