शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची सातारा येथे बदली - Government Medical College Miraj
मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयातील ३१ डॉक्टरांची तडका-फडकी सातारा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. या डॉक्टरांच्या बदलीमुळे कोरोना रुग्णालयातील उपचार सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सांगली - मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयातील ३१ डॉक्टरांची तडका-फडकी सातारा या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. डॉक्टरांना तातडीने सातारा या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांकडून देण्यात आले आहेत.
31 डॉक्टरांची अचानक बदली
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न शासकीय कोरोना रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या ३१ प्राध्यापक-डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे. सातारा या ठिकाणी नव्याने होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांची बदली करण्यात आली आहे. या सर्व डॉक्टरांना तत्काळ सातारा या ठिकाणी सेवेत रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. हे डॉक्टर मिरजेच्या शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार सेवा देत होते. त्यामुळे या डॉक्टरांच्या बदलीमुळे कोरोना रुग्णालयात उपचार सेवेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा -जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लसही भारतात होणार दाखल