सांगली - अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सांगलीच्या कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला असून, लाच स्वीकारणाऱ्या नितीन चिवटे नामक डॉक्टरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
अवघ्या 30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरला अटक
30 रुपयांची लाच घेताना प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सांगलीच्या कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला असून, लाच स्वीकारणाऱ्या नितीन चिवटे नामक डॉक्टरवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
एका डॉक्टरने अवघ्या 30 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथे घडला आहे. शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामधील डॉ. चिवटे याला 30 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे. कुरळप येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शासनाकडून रुग्णांच्यावर मोफत उपचार करण्यात येतात. मात्र, डॉक्टर नितीन चिवटे हे प्रत्येक रुग्णाकडून औषधोपचार तपासणीसाठी तीस रुपये आणि सलाईनसाठी शंभर रुपये अशी मागणी करत होते.
संबंधित घटनेसंदर्भात एका तक्रारदाराने सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आज (दि.२६ जुलै) रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोग्य केंद्रात सापळा लावून रुग्णांवर उपचार करण्यासाठी लाच घेत असताना पकडले. त्यांच्या विरोधात कुरळप पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई उशीरा पर्यंत सुरू होती.