सांगली- परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आज पुणे विभागीय आयुक्तांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील नुकसान झालेल्या द्राक्ष आणि डाळींब बागांची पाहणी करत आढावा घेतला आहे.
सांगलीत विभागीय आयुक्तांनी केली नुकसानग्रस्त फळबागांसह पिकांची पाहणी हेही वाचा-युतीचे मित्रपक्ष सत्तास्थापनेसाठी आतुर; राज्यपालांची घेतली भेट
परतीच्या पावसामुळे यंदा जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 55 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके, फळबागा बाधित झाल्या आहेत. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आहे.
परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका हा तासगाव तालुक्यातील द्राक्षबाग शेती त्यापाठोपाठ डाळींब बागा आणि खरीप ज्वारीसह अन्य पिकांना बसला आहे. त्यामुळे म्हैसेकर यांनी तासगाव आणि कवठेमहांकाळ येथील द्राक्षबाग आणि डाळींब बागांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. यावेळी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी समीर शिंगटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी म्हैसेकर यांनी प्रशासनाला तातडीने सर्व पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.