महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात समाजातील 500 लोकांना अन्न व फळांचे वाटप - कोरोना इफेक्ट ऑन ईद सांगली बातमी

सध्या रमजान हा कोरोनाच्या संकटकाळात आल्याने आणि समाजातील लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने सर्वजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे रमजानचा उपवास सोडण्यासाठी सांगली येथली पीरअली पुणेकर हे स्वखर्चातून सलग पंधरा दिवस शहरातील सुमारे ५०० व्यक्तींना दररोज अन्नदान व केळी, द्राक्ष, चिक्कू कलिंगड यासारखी फळे वाटप करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात समाजातील 500 लोकांना अन्न वाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात समाजातील 500 लोकांना अन्न वाटप

By

Published : May 24, 2020, 3:30 PM IST

Updated : May 24, 2020, 10:14 PM IST

सांगली - जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पीरअली पुणेकर हे सलग दहा वर्ष नगरसेवक होते. तर, सध्या त्यांची पत्नी नगरसेवक पद भूषवित आहेत. पुणेकर हे गेल्या पंधरा वर्षांपासून रमजान महिन्यामध्ये समाजातील लोकांना उपवास सोडण्यासाठी फळे व जेवण देत असतात. परंतु सध्या रमजान हा कोरोनाच्या संकटकाळात आल्याने आणि समाजातील लोकांच्या हाताला कामधंदा नसल्याने सर्वजण बेरोजगार झाले आहेत. यामुळे रमजानचा उपवास सोडण्यासाठी पीरअली पुणेकर हे स्वखर्चातून सलग पंधरा दिवस शहरातील सुमारे ५०० व्यक्तींना दररोज अन्नदान व केळी, द्राक्ष, चिक्कू कलिंगड यासारखी फळे वाटप करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान महिन्यात समाजातील 500 लोकांना अन्न व फळांचे वाटप

त्यांच्या या उपक्रमास जलसंपदा व सांगली जिल्हा पालक मंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन अगबर येथे काही मंडळींना किटचें वाटप करण्यात आले. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खाजदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी नगराध्यक्ष दादा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष शहाजी पाटील उपस्थित होते. यावेळी पुणेकर म्हणाले, आम्ही उपवास सुरू झालेल्या दुसऱ्या दिवसापासून हा उपक्रम राबवित आहोत. रमजान ईद 20 मे रोजी आहे. दिनांक 24 मे पर्यंत आम्ही हा उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फिरोज पठाण, अमिर इबुशे, मिनाज मिर्झा, जहांगीर महाबरी, मोसिन मुल्ला, जमीर शेख, रियाज लांडगे, सलीम इबूशे रहीम तुल्ला जमादार, फारुख मोमीन, इस्माईल पुणेकर, गुफरान पटवेकर, सैफ पठाण, राजू मोमीन, मेहबूब चाऊस, रोहन कोठावळे, साबाज तांबोळी, रमजान मुल्ला, अजिज इबूशे, निहाल जमादार, मोहम्मद वाईकर, साजिद पटवेकर, राजू जमादार,इमरान मुल्ला, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते याचे संयोजन करत आहेत.

Last Updated : May 24, 2020, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details