महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगलीत व्यापारी आणि तोलाईदारांचा वाद उफाळला, हमालांचे धरणे तर व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद

तोलाई दराच्या प्रश्नावर योग्य तोडगा न निघाल्याने सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला. यामुळे हमाल संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले. तर व्यापाऱ्यांनी व्यापार बंद आंदोलन सुरू केले आहे.

dispute-between-the-traders-and-the-weighed-in-sangli
सांगलीमध्ये व्यापारी आणि तोलाईदारांचा वाद उफाळला

By

Published : Jan 31, 2020, 4:54 PM IST

सांगली - तोलाई दराच्या प्रश्नावर योग्य तोडगा निघू न शकल्याने सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद उफाळून आला. हमाल संघटनेने धरणे आंदोलन सुरू केले, तर व्यापाऱ्यांनी व्यापार बंद आंदोलन छेडले आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतला व्यापार ठप्प पडला आहे.

सांगलीमध्ये व्यापारी आणि तोलाईदारांचा वाद उफाळला

हेही वाचा -सांगलीत भारत बंदला हिंसक वळण, आंदोलकांकडून रिक्षावर दगडफेक

सांगलीमध्ये व्यापारी आणि हमालामध्ये तोलाई दराचा वाद उफाळला आहे. तोलाई देण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्याने संतप्त हमालांनी मार्केट कमिटीच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. तोलाई दरासाठी गेल्या ३७ दिवसांपासून हमाला संघटनेच्या माध्यमातून हमालांचे आंदोलन सुरू आहे. गुरुवारी या प्रश्नाबाबत व्यापारी आणि हमाल संघटनांमध्ये बैठक झाली. मात्र, या बैठकीमध्ये योग्य तोडगा निघू शकला नाही. याउलट या बैठकीत आणखी वाद उफाळून आला. त्याचे परिणाम आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उमटले आहेत. व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या भूमिकेविरोधात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर व्यापाऱ्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा -जागेच्या वादातून २४ तासांपासून रखडला अंत्यविधी

दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांनी हमाल संघटनेवर व्यापाऱ्यांची बदनामी आणि द्वेषापोटी आंदोलन करण्यात येत असल्याचा आरोप करत बेमुदत व्यापार बंद आंदोलन पुकारले आहे. हमाल, तोलाईदार आणि हमाल प्रतिनिधी व्यापाऱ्यांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत बंद मागे न घेण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. मात्र, व्यापारी आणि हमाल संघटनांच्या या आंदोलनाच्या भूमिकेमुळे मार्केट यार्डातील सर्व व्यवहार झाले ठप्प झाले आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल यामुळे थांबली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details