सांगली - संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. पूर परिस्थितीमध्ये अनेकांना मदत करण्यामध्ये योग्य प्रशिक्षण नसल्याने अडचणी येतात आणि हीच गरज ओळखून कृष्णा नदीपात्रामध्ये विविध सामाजिक संघटना आणि बोट क्लबच्या माध्यमातून प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
शिवप्रतिष्ठान युवाकडून कृष्णा नदीत पार पाडले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर बचाव कार्यात सहभागी होणाची इच्छा असणाऱ्यासाठी प्रशिक्षण -
2019मध्ये सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते. अनेक गावांना महापूराचा वेढा पडला होता, तर सांगली शहर पाण्यात बुडाले होता. मोठ्या संकटात असताना या संघटनांमध्ये प्रशासनासह सामाजिक संस्थांचीही मदत तोकडी पडली होती. बचाव कार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. बचाव कार्यात मदत करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, परिस्थितीचा अंदाज नसल्याने ती करता आली नाही. ही बाब ओळखून शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, अशा व्यक्तींच्यासाठी आपत्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता.
कृष्णा नदीत पार पडली प्रात्यक्षिक -
सांगली शहरातल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये वसंतदादा स्फूर्ती स्थळ याठिकाणी सांगली महापालिका आणि रॉयल कृष्णा बोट क्लबच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आली, यावेळी सांगली शहरातल्या अनेक सामाजिक संघटना बचाव कार्यामध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.