महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vishnu Das Bhave Award : रंगभूमी दिनानिमित्त विष्णूदास भावे पुरस्काराने जेष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकर सन्मानित... - Satish Alekar honored with Vishnudas Bhave Award

यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ( Vishnudas Bhave Award ) जेष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकर यांना प्रदान रंगभूमी दिनानिमित्त ( occasion of Rangbhumi Day ) प्रदान करण्यात आला आहे.सांगली मध्ये शानदार समारंभात जेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 5, 2022, 10:47 PM IST

सांगली : यंदाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार ( Vishnudas Bhave Award ) जेष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकर यांना प्रदान रंगभूमी दिनानिमित्त ( occasion of Rangbhumi Day ) प्रदान करण्यात आला आहे.सांगली मध्ये शानदार समारंभात जेष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात आला.

रंगभूमी क्षेत्रात मानाचा पुरस्कार - यंदाचा हा 54 वा पुरस्कार असून मराठी रंगभूमी क्षेत्रात हा मानाचा पुरस्कार समजला जातो. नाट्य क्षेत्रातील सेवा आणि उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो आणि यंदा जेष्ठ दिग्दर्शक,अभिनेते, पटकथाकार सतीश आळेकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

सतीश आळेकर पुरस्काराने सन्मानित - आज रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सांगलीतील भावी नाट्य मंदिरामध्ये शानदार सोहळ्यात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या गौरवपदक, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन सतीश आळेकर यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी नाट्य क्षेत्रातील कलाकार व मान्यवर आणि सांगलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details