सांगली - काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे सांगली जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. सैन्य दलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर शिवसेनेकडून पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करण्यात आले. भाजपकडून सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दहशतवादी हल्ल्याचे जिल्ह्यात संतप्त पडसाद ,अनेक गावात बंद, तर ठीकठिकाणी पाकिस्तान विरोधात निदर्शने. भाजपाकडून वाहण्यात आली श्रद्धांजली... - martyrs
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे सांगली जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटत आहेत. सैन्य दलावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४२ जवानांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात संतप्त व्यक्त करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर शिवसेनेकडून सांगलीमध्ये पाकिस्तानच्या ध्वजाचे दहन करत निषेध नोंदवण्यात आला.
कॉलेज कॉर्नर याठिकाणी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजपकडून हल्ल्याचा निषेध नोंदवत मृत जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत यावेळी मृत सैनिकांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीत खोत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.